आष्टी पोलीस ठाण्यात POCSO व BNS अंतर्गत गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत माजी सरपंच नवनाथ सोपान आयंदे याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४८/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
घटना काय घडली?
पीडिता बारावी उत्तीर्ण असून ती आपल्या पालकांना शेतीकामात मदत करते. आरोपी नवनाथ आयंदे हा पीडितेच्या वडिलांचा जवळचा मित्र असल्याने त्याचे घरी व शेतावर नेहमी येणे-जाणे असे. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने सुमारे चार महिन्यांपूर्वी पीडितेला पैशाचे आमिष दाखवत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पीडितेने वारंवार नकार देऊनही आरोपीने अनेकदा तिच्यावर जबरदस्ती केली.
वैद्यकीय तपासणीत उघड झाले सत्य
काही दिवसांपूर्वी पीडितेला उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने संपूर्ण घटना सांगितली.
कोणते गुन्हे दाखल?
आष्टी पोलीस ठाण्यात खालील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे —
- POCSO कायदा — कलम ४, ८ व १२
- भारतीय न्याय संहिता — कलम ६४(१) व ६४(२)
तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. साठे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आरोपी अद्याप फरार
गुन्हा दाखल होताच आरोपी नवनाथ आयंदे पसार झाला. पोलीस त्याच्या शोधात आहेत. लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
Also Read : गोदावरी नदीत 40 प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

0 टिप्पण्या