⚡ चंदनझिरा समाचार
🔴 ताज्या बातम्या
दिनांक: १९ मे २०२६ | जिल्हा जालना, महाराष्ट्र
पोलीस ठाणे चंदनझिरा
⚡ ब्रेकिंग: तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींवर चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई — दोन धारदार तलवारी जप्त — आरोपींवर गुन्हा दाखल ⚡
⚡ ब्रेकिंग न्यूज
तलवार घेऊन दहशत माजवणारे दोन आरोपी ताब्यात — MIDC व चंदनझिरा भागात पोलिसांची मोठी कारवाई
जालना जिल्ह्यात चंदनझिरा पोलिसांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये धारदार शस्त्रे जप्त करून कठोर कारवाई केली
📍 पहिले प्रकरण — MIDC भागातून २२ वर्षीय आरोपी अटकेत
दिनांक १८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता MIDC भागातील आयकॉन स्टील चौकात २२ वर्षीय सय्यद साबेर सय्यद निसार, रा. नूतन वसाहत जालना, हा धारदार तलवार हातात घेऊन जोरजोरात आरडाओरडा करत दहशत माजवत होता. पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांना माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपीस ताब्यात घेतले व तलवार जप्त केली.
आरोपीचे नावसय्यद साबेर सय्यद निसार
वय२२ वर्षे
कलम४/२५ भारतीय हत्यार कायदा
तपास अधिकारीपो.अ. प्रशांत देशमुख
📍 दुसरे प्रकरण — चंदनझिरा पद्मावती नगरमध्ये बालआरोपी
दिनांक १७ मे २०२६ रोजी चंदनझिरा भागातील पद्मावती नगर येथे एका बालापचाऱ्याकडे तलवार असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने जाऊन त्याच्याकडून एक धारदार तलवार जप्त केली. सदर बालापचाऱ्याविरुद्ध पो.उ.पि. स्कॉट यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पो.अ. संतोष वनवे करीत आहेत.
▸ कारवाईत सहभागी पथक
पोलीस अधीक्षक श्री. तेगबिर सिंह संधू साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन कटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षकश्री. बाळासाहेब पवार
पो.उ.पि.मारियो स्कॉट
पो.उ.पि.सय्यद सपोउपि
पो.उ.पि.मनसूब वेताळ
पो.हे.कॉ.प्रशांत देशमुख
पोलीस कर्मीकृष्णा तंगे
पोलीस कर्मीरविंद्र देशमुख
पोलीस कर्मीसागर खैरे
📋 स्रोत: प्रेस नोट — पोलीस ठाणे चंदनझिरा, जि. जालना
१९/०५/२०२६
.png)
0 टिप्पण्या